मन अशांत असल्यास हे उपाय करून बघा
आपल्या या धकाधकीच्या आयुष्यात सर्व साधने मिळविण्यासाठी आपण आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहोत, आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मानसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे. मन अशांत असल्यास पावलोपावली अडथळे येतात. आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मानसिक ताण वाढवतात. वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय सांगितले आहे जे मानसिक शांती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
मानसिक शांतता मिळविण्यासाठी कधीही आपले घर एकांतात बनवू नका. घराजवळ वर्दळ असावी.
घर नेहमी स्वच्छ असावं.
कुटुंबाच्या सदस्यांशी नेहमी हळू आवाजात आणि प्रेमाने बोलावं.
घराच्या मुख्य दारावर दोन्ही कडे ॐ आणि स्वस्तिकची चिन्ह बनवा.
सकाळ संध्याकाळ घरात आणि कार्यक्षेत्रात उदबत्ती लावा.
दररोज गायत्रीमंत्राचा जप करावा.
सकाळी उठल्यावर वडीलधाऱ्यांच्या पाया पडा.
सर्जनशील कामात रस घ्या.
कमी अन्न खा.
कौटुंबिक समस्यांमुळे मन अशांत असल्यास एका मातीच्या भांड्यात कच्चं दूध घ्या आणि त्यात मध मिसळून घराच्या मुख्य दारावर शिंपडा.
घरात कधीही कोळीचे जाळं बनू देऊ नका यामुळे मानसिक ताण वाढतो.
स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ ठेवावं.
घराच्या कोपऱ्यात अंधार होऊ देऊ नका.
झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाची स्वच्छता करा आणि स्वच्छ चादर अंथरा.
झोपण्याच्या खोलीत कधीही पाय दाराकडे करून झोपू नये.
झोपताना कधी ही उशाशी किंवा पलंगाखाली जोडे-चपला असू नये.
झोपण्याच्या खोलीत केरसुणी, विस्तव, मादक पदार्थ ठेवू नये.