या 3 गोष्टी घरात वास्तूदोष वा नकारात्मकता निर्माण करु शकतात
घर बांधत असताना किंवा नवीन घर खरेदी करत असताना सर्वसाधारणत: लोक वास्तूचा विचार करतात. वास्तू – वास्तूदोष या गोष्टी प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. मात्र, जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात ते घर घेतेवेळी वास्तूचा प्रामुख्याने विचार करतात. इतकंच नाही तर घराची सजावट करत असतानाही बरेच लोक वास्तूचा विचार करतात. वास्तूच्या हिशोबाने कुठल्या वस्तू घरात ठेवाव्यात आणि कुठल्या ठेवू नयेत याविषयी मार्गदर्शन घेतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार पुढील ३ गोष्टी घरात वास्तूदोष वा नकारात्मकता निर्माण करु शकतात. जाणून घेऊया त्या ३ गोष्टींविषयी आणि त्यामागील कारणांविषयी.
1. ताजमहलाची प्रतिकृती
ताजमहाल हा प्रेमाचे प्रतिक मानले जाते. इतकंच नाही तर ताजमहाल जगातल्या आठ आश्चर्यांपैकी एक आहे. मात्र, त्याला एक दुसरी बाजू देखील आहे. इतिहास पाहता ताजमहाल ही वास्तवात मुमताजची यांची दफन भूमी/ कबर आहे. त्यामुळे त्याचा संबंध अशुभाशी जोडला जातो. त्यामुळे ताजमहलची प्रतिकृती घरात ठेवू नये, असा सल्ला वास्तूतज्ञ देतात.
2. नटराजाची मूर्ती
नटराजाला नृत्याची देवता म्हटलं जातं. त्यामुळे नृत्याच्या कार्यक्रमामध्ये नटराजाचे पूजनदेखील केले जाते. मात्र, असे असले तरीही नटराज हे शंकरांचं तांडव अवस्थेतलं अर्थात रुद्रावस्थेतलं रूप आहे. त्यामुळे नटराजाची मूर्ती घरात ठेवल्यास त्यातून नाकारात्मक उर्जा पसरु शकतात असे तज्ञांकडून सांगण्यात येते.
3. हिंस्त्र जंगली प्राण्यांच्या मूर्ती किंवा खेळणी
बरेचजण जंगली प्राण्यांवरील आपल्या प्रेमापोटी अनेक हिंस्त्र प्राण्यांच्या प्रतिकृती घरामध्ये ठेवतात. याशिवाय लहान मुलांनादेखील सहसा वाघ-सिंह अशा प्राण्यांच्या प्रतिकृती खेळणी म्हणून दिल्या जातात. मात्र, अशाप्रकारे जंगली हिंस्त्र प्राणी घरात असल्यास घरातील सदस्यांचे आणि विशेषत: लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे या गोष्टी घरात आणू नयेत.