मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (09:05 IST)

गणपतीला अर्पित करा या 5 गोष्टी, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील

मंगळवार, बुधवार किंवा चतुर्थी तिथी असो हे दिवस गणपती पूजेसाठी खास असतात. या दिवशी गणेशाची विशेष पूजा करावी. पूजेच्या वेळी त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण कराव्या. या वस्तू अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. काय आहे त्या 5 गोष्टी जाणून घ्या- 
 
१. मोदक किंवा लाडू: गणेशाला मोदक किंवा लाडूचे नैवेद्य दाखवावं. मोदकाचे बरेच प्रकारा असतात. महाराष्ट्रात विशेषत: गणेशपूजनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे मोदक तयार केले जातात. मोदकांव्यतिरिक्त गणेशाला मोतीचूर लाडू सुद्धा आवडतात. शुद्ध तुपात बनवलेल्या बेसन लाडूलाही प्राधान्य दिले जाते. याशिवाय तुम्ही त्यांना बूंदीचे लाडू देखील अर्पित करु शकता. गणपतीला नारळ, तीळ आणि रव्‍याचे लाडू देखील नैवेद्य म्हणून दाखवले जातात. गणपतीला तूप आणि गूळही अर्पण करता येतं.
 
२. दुर्वा: गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. गणेशजींना दुर्वा खूप प्रिय आहे. दुर्वाच्या वरच्या भागावर तीन किंवा पाच पाने असल्यास फारच उत्तम.
 
3. फुले: आचर भूषण ग्रंथानुसार, तुळशी वगळता सर्व प्रकारच्या फुलांद्वारे भगवान गणेशाचे पूजन करता येतं. पद्म पुराण आचार्यरत्न मध्ये असे लिहिले आहे की 'ना तुळस्या गणधिपम' म्हणजे कधीच तुळशीने गणेशाची पूजा करू नये. त्यांना झेंडूचे फुलं देखील अर्पित केले जातात.
 
४. केळी: गणेशाला केळी खूप आवडतात. त्यांना कधीही ऐक केळ अर्पित करु नये. जोड्यांमध्ये केळी अर्पण करा.
 
५. शेंदूर: गणेशजी शेंदूर अर्पित केलं जातं. शेंदूर मंगळ प्रतीक आहे. शिवपुराणमध्ये गणपतीला शेंदूर लेप याबद्दल एक श्लोक आाहे.  ‘आनने तव सिन्‍दूरं दृश्‍यते साम्‍प्रतं यदि। तस्‍मात् त्‍वं पूजनीयोअसि सिन्‍दूरेण सदा नरै:।।’ अर्थात जेव्हा महादेवाने गणपतीचे मस्तक कापले आणि हत्तीचे डोके लावले तेव्हा शेंदूर आधीच लेपला जात होता. आई पार्वतीने शेंदूर बघितलं तेव्हा त्या म्हणाल्या की त्यांच्या मुखावर ज्या शेंदूराचे विलेपन होत आहे मानव नेहमीच त्या शेंदुराने त्यांची पूजा करतील. अशा प्रकारे श्री विघ्नहर्ता यांच्यावर शेंदूर लावण्यात येतं.
 
याशिवाय सुपारी, अख्खी हळद, मौलीचा धागा आणि जानवं देखील अपिर्त केलं जातं.