रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

भाड्याच्या घरात राहात असाल तर हे उपाय नक्की करून पाहा

प्रत्येकालाच वाटत असते की आपले स्वत:हाचे घर असावे. पण काही कारणांमुळे बर्‍याच जणांचे हे स्वप्न पुर्ण होत नाही. सध्या असे बरेच लोक आहेत जे आपले आयुष्य भाड्याच्या घरात राहून काढत आहेत. त्यांचे घर न होण्यामागे बरीच कारणे असू शकतात . वास्तूमध्ये असलेल्या दोषामुळे देखील हा परिणाम होऊ शकतो.  भाड्याच्या घरात राहणार्‍यांनी पुढील गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. भाड्याच्या घरात देखील व्यक्ती सुखी आणि समृध्द जीवन जगु शकतो.

जेवताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. हा उपाय केल्यास जेवणाची पूर्ण शक्ती प्राप्त होते आणि वास्तुदोष नष्ट होतो.

देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावे.

घराच्या गच्चीवर कुठलेही भंगार जमा करून ठेवू नये.

घरातील ईशान्य भागात काही ठेवू नये तो भाग रिकामा ठेवावा.

घरामध्ये बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील पाण्याचा सप्लाय उत्तर-पूर्व दिशेकडून घ्यावा. त्याचबरोबर बाथरूम, स्वयंपाकघर, इतर ठिकाणी असलेल्या नळातून

पाणी टपकनार नाही याची कलजिओ घ्यावी. पाणी टपकने अशुभ मानले जाते. जसजसा नल टपकत राहतो ठीक त्याप्रमाणे पैशाचा अपव्यय होतो.

बेडरूममध्ये पलंगाचे डोके दक्षिण दिशेकडे असावे. लक्षात ठेवा झोपताना तुमचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला असावेत. हे शक्य नसेल तर

पश्चिम दिशेला डोके करून झोपावे. अशाप्रकारे झोपल्यास विविध आजारांपासून बचाव होईल.

घरातील जड वस्तू किंवा अनावश्यक सामान घरातील दक्षिण-पश्चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान किंवा वस्तू ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ

मानले जाते. हा उपाय केल्यास आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल.