लिविंग रूमसाठी वास्तू टिप्स
मुख्य दारासमोर असणारा लिविंग रूम अत्यंत शुभ असतो.
तसेच पूर्व आणि उत्तर दिशेकडे जास्त खुले असणारे लिविंग रूम देखील शुभ फलदायी असतात.
प्रकाश असणारे लिविंग रूम देखील वास्तू प्रमाणे जास्त शुभ मानले जाते.
असे लिविंग ज्याची खिडकी फार मोठी आणि आतील बाजूला उघडणारी असेल तर ते वास्तूप्रमाणे योग्य नसते, असे घर विकत घेताना सावधगिरी बाळगायला पाहिजे.
लिविंग रूमच्या भिंतीला चिटकून ठेवलेले फर्निचर सौभाग्यवर्धक मानले जातात. पण सोफ्याच्या ठीक मागे खिडकी किंवा दाराचे असणे अशुभ मानले जाते. अशात भिंतीवर आरसा लावून या वास्तुदोषाला दूर करू शकता.
लिविंग रूममध्ये धारदार फर्निचर नाही ठेवायला पाहिजे. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी नुकसान होण्याची शक्यता असते.