शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (00:08 IST)

सॅलड देखील वजन वाढवतो? कसे ते जाणून घ्या

आपण वाढवलेल्या वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असाल किंवा जास्त करून सॅलडचे सेवन करत असाल तर आपण याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण की सॅलड देखील आपले वजन वाढवू शकतो. होय, जरी आपल्याला धक्का बसला असेल तरीही हे पूर्णपणे सत्य आहे.
 
जरी हे सर्व प्रकारच्या सॅलडवर लागू होत नाही, परंतु बर्याच बाबतीत जेथे आपण मधुर आणि व्यसनाधीन सॅलडचा आनंद घेता, आपले वजन वाढण्याची शक्यता असते. जेव्हा आपण खाण्यासाठी कुठेतरी बाहेर जाता, तर आपल्या आवडीच्या मेयोनेझ आणि क्रीमसह सॅलड खूप आवडीने खाता किंवा कधी सिझलरच्या काराणाभूती भाज्यामध्ये भरपूर सॉस वापरता. परंतु असे सॅलड कॅलरीज समृध्द असतात आणि वजन कमी करण्याऐवजी त्याला वाढवू शकतात. 
 
या व्यतिरिक्त, बर्याच मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सॅलड गार्निशिंगमध्ये अशा गोष्टी वापरल्या जातात ज्या कॅलरीज समृध्द असतात आणि स्वाद वाढवताना, ते वजन वाढविण्यात देखील योगदान देतात. म्हणून जेव्हाही आपण सॅलड खाल तेव्हा याची विशेष काळजी घ्या की ते शुद्ध असो, म्हणजे, त्यात चव वाढविण्यासाठी इतर कॅलरी-समृध्द पदार्थांचा वापर केला जात नसेल.