शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (00:09 IST)

बाथरूमसाठी वास्तू टिप्स

टॉयलेट आणि बाथरूम अशी जागा आहे, जेथून पाणी नेहमी घरातून बाहेर निघत आणि पाण्याचे वाहणे म्हणजे 'धना'चा अपव्यय होणे असे समजले जाते, म्हणून बाथरूमला नेहमी घराच्या आतील मुख्य खोल्यांपासून दूर बनवायला पाहिजे, ज्याने धन व्यर्थ होत नाही. 
 
* मुख्य दारासमोर बनलेले टॉयलेट किंवा बाथरूम अशुभ असतात. यामुळे धन आणि आरोग्य दोघांवर वाईट प्रभाव पडतो. 
 
* या प्रकारे उत्तर पूर्व किंवा दक्षिण पश्चिम कोपर्‍यात कधीही बाथरूम किंवा टॉयलेट नाही बनवायला पाहिजे. 
 
* पायर्‍यांच्या खाली देखील बनलेले टॉयलेट किंवा बाथरूम देखील अशुभ असतात. 
 
* या गोष्टींचे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की बाथरूम किंवा टॉयलेटच्या दारामागे नळ, सिंक इत्यादी नको. 
 
* बाथरूममध्ये टब किंवा शॉवर नेमही उत्तर दिशेकडे असायला पाहिजे. चुकूनही अंघोळीचा टब किंवा शॉवर दक्षिण दिशेकडे नको, कारण दक्षिण दिशा अग्नी तत्त्वाशी निगडित असते. 
 
* जर बाथरूमचा एखादा भाग आधीपासूनच दक्षिण दिशेकडे असेल आणि याला बदलणे शक्य नसेल तर याजवळ एखादी काळी वस्तू ठेवायला पाहिजे. यामुळे त्याचा कुप्रभाव कमी होण्यास मदत मिळेल. 
 
* बाथरूममध्ये जेवढे आवश्यक सामान असते तेच ठेवायला पाहिजे. अनावश्यक शॅम्पू, लोशन इत्यादी ठेवून जागेचा दुरुपयोग करू नये. तसेच बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.