बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 8 जून 2023 (06:50 IST)

Vastu tips : घरातील जिन्याच्या खाली या वस्तू ठेवणे टाळा

Vastu for Stairs
घरात जिना असल्यास वास्तूच्या हिशोबाने त्याची दिशा योग्य असली पाहिजे. योग्य जागेवर जिना नसल्याने घरात अशांती, कुटुंबातील सदस्यांना अपयश, मानसिक त्रास, तणाव आणि आत्मविश्वासात कमतरता असे प्रकार जाणवतात. तसेच अनेक लोक जिन्याखाली जागेचा उपयोग म्हणून खूप काही वस्तू भरुन देतात परंतू वास्तू प्रमाणे हे कितपत योग्य आहे वा नाही हे आज आपण जाणून घ्या. सर्वप्रथम घरात जिना काढताना वास्तुनुसारच बनवा. 
 
वास्तुशास्त्रानुसार जर जिन्यांची दिशा योग्य नसेल तर अनेकदा घरात अशुभ घटना घडतात. 
 
 
जिना बनवण्यासाठी दक्षिण-पश्चिम उजवी बाजू योग्य ठरेल.
जर जिना गोलाकार असेल जिन्याची दिशा पूर्वेकडून दक्षिण, दक्षिणेकडून पश्चिम, पश्चिमेकडून उत्तर अथवा उत्तरेकडून पूर्वेच्या दिशेने जाणारी असावी. 
जिन्याची दिशा नेहमी उजवीकडून डावीकडे जाणारी असावी. 
पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने जाणार्‍या जिन्याची संख्या विषम असावी. याने घर मालकाची प्रगती होते आणि प्रसिद्धीही वाढते.
जर जिने चुकीच्या दिशेमध्ये बनवलेला असेल आणि त्यात सुधारणा करण्याची गुंजाइश नसेल तर तोडफोड न करता जिन्याच्या समोर मोठा आरसा लावा. 
जिना तुटलेला नसावा नाहीतर जीवनात चढ-उतार येण्याची शक्यता असते. 
जिन्यांवर प्रकाशाची योग्य व्यवस्था असावी. 
जिन्यात अंधार असल्यास खर्च वाढण्याची शक्यता वाढते.
जिन्याच्या खाली कधीही तुम्ही सिलेंडर, चपला किंवा कपाट ठेवू नका. 
जिन्याच्या खाली देवघर किंवा बाथरुम नसावे. 
एका मजल्यावर जिन्याला सतरा पायऱ्या असणे शुभ मानले जाते. 
घराच्या मध्यभागी कधीही जिने बनवू नये कारण हे ब्रम्हस्थान असते. 
घराच्या मुख्य दारासमोर जिना नसावा याने आर्थिक विकासात अडचण येते.