गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

घर, ऑफिसप्रमाणे पर्सचा वास्तू!

घराचा वास्तू, ऑफिसचा वास्तू, तुमच्या कारचा वास्तू, प्रत्येक गोष्टींत जेव्हा आपण वास्तूचे लक्ष ठेवतो तर पर्सच्या बाबतीत का नाही? ज्या प्रकारे आमच्या जवळपासच्या वातावरणामुळे आम्ही प्रभावित होतो त्याच प्रकारे आमचा पर्स किंवा बँगसुद्धा आम्हाला प्रभावित करतात. तर मग आता बॅगला वास्तू प्रमाणे ठेवून तुम्ही धनवर्षा करू शकता. 

- आपल्या पर्समध्ये लाल रंगाचा लिफाफा ठेवायला पाहिजे. त्यात तुम्ही एका कागदावर तुमची एखादी मनोकामना लिहून ठेवावी. ती लवकरच पूर्ण होईल.
- पर्समध्ये लाल रेशमी दोऱ्याची एक गाठ बांधून ठेवावी.
-पर्समध्ये लहान आरसा आणि चाकू अवश्य ठेवले पाहिजे.
- पर्समध्ये जेथे रुपये ठेवतो त्या ठिकाणी कौडी किंवा गोमती चक्र अवश्य ठेवावे.
- पर्समध्ये एखादे पिरॅमिड ठेवायला पाहिजे. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.