शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरात ठेवू नये या 10 वस्तू

अचानक आपल्या जीवनात काही बदल घडतंय, दिवस वाईट जातंय, रोज काही न काही नकारात्मक घडतंय तर सावध होऊन जा. असे होत असल्या आपल्या घरातील वस्तूंवर नजर घाला. कदाचित घरातील काही वस्तू वाईट परिणाम घडवून आणतं असतील.
 
भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्याला एका लहानश्या वस्तूमुळे अडथळे येतात. लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूमध्येही आपली एक ऊर्जा असते.


 
चला पाहू या कोणत्या आहे त्या वस्तू ज्या घरात ठेवू नये. ज्या ठेवल्यामुळे जीवन दुखी होतं.
 
पुढे वाचा....

तुटक्या फुटक्या वस्तू: तुटके फुटके भांडी, काच, आरसा, इलेक्ट्रिक सामान, फोटो, फर्निचर, पलंग, घडी, दिवा, कुंचा, कप व इतर असे कोणतेही सामान घरात ठेवणे उचित नाही. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो. या वस्तूंमुळे वास्तू दोष उत्पन्न होत असून अश्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही.


हे फोटो ठेवू नये: महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालाचे चित्र, बुडत असलेली नाव किंवा जहाज, फवारे, जंगली जनावरांचे चित्र, काटेदार झाडांचे चित्र घरात लावू नये. याने मनावर वाईट परिणाम होते आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात. ज्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातं.



असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो. नटराजची मूर्ती ठेवणे विनाशाचा प्रतीक आहे. ताजमहाल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मक होते. बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवून देतं. याने संबंध बिगडतात.
 
फवारेजात चित्र लावल्याने घरात येणारा पैसा वाहत्या पाण्यासारखा वाहून जातो. तसेच जंगली जनावरांचे चित्र लावल्याने घरातील लोकांचे स्वभावही तसेच होऊ लागतात. आणि काटेदार झाडं आपल्या जीवनात काटे पेरतात.
 
म्हणूनच फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूकडे लक्ष द्यायला हवे. वाळलेले झाडं, उजाडलेले गाव, पसरलेले घर व इतर चित्र कलात्मक वाटतं असले तरी त्याने नकारात्मकता पसरते.


जुन्या किंवा फाटक्या कपड्याची पोटली: अधिकश्या लोकांकडे घरातील अलमारी किंवा दिवाण पेटीत जुन्या कपड्यांची पोटली असते. अनेक अनुपयोगी कपडे लोक अलमारीतल्या खालील बाजूला ठेवून देतात.


 
फाटक्या चादरी आणि कपड्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्मित होते. असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्यांचा तात्काळ इतर कामांमध्ये वापर केला पाहिजे.

भंगार: लोकं घरात अटाळा किंवा भंगार जमा करून ठेवतात. यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी. जुने- तुटके फुटके जोडे चपला आपल्या पुढे वाढण्यापासून थांबवतात. यांना आ‍धी घरातून बाहेर काढा.



घरातील गच्चीवर पडलेला भंगारदेखील पेश्याची कमीला कारणीभूत ठरतं. गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नाही. याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतं. याने पितृदोष उत्पन्न होतं.
 

अपवित्र पर्स किंवा तिजोरी: कधीही फाटलेला पर्स वापरू नये. पर्स किंवा तिजोरीत पवित्र वस्तू ठेवाव्या. पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकाराची अपवित्र वस्तू ठेवू नये. पर्स आणि तिजोरीत देवाचे चित्र ठेवू शकतात. पूजेची सुपारी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र इतर वस्तूदेखील ठेवू शकतात.


तुटलेली किंवा खुली अलमारी: घरात तुटलेली किंवा खुली अलमारी ठेवू नाही. अशी अलमारी ठेवल्याने कार्यात अडथळे येतात. आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो.


खंडित मूर्ती किंवा चित्र: देवी देवतांचे खंडित फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने आर्थिक कष्ट होतात. म्हणून,: त्यांना पवित्र नदीत वाहून दिले पाहिजे. तसेच देवी देवतांचे फोटो घर सजवण्यासाठी कामास घेऊ नये. त्याची संख्या आणि स्थान निश्चित हवं.



याव्यतिरिक्त निर्माल्य घरात ठेवू नये याने अशुभ फल प्राप्त होतं. तसेच आपण वाईट नजरेपासून वाचण्यासाठी लिंबू-मिरची वापरत असाल तर प्रत्येक आठवड्यात ते हटवून नवीन लावायला हवे.
कोळी जाळं: घरात कोळी जाळं बघितल्याक्षणी स्वच्छ करावे. अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणे पण असे नाही. कोळी ते जाळं शिकार फसवण्यासाठी विणते म्हणून हे जाळं घरात असणे योग्य नाही.


प्लास्टिक सामान: सध्या प्लास्टिकच्या वस्तूंचा क्रेझ वाढला आहे. किचनमधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो. पण याने नकारात्मकता तर पसरतेच पण हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्त्व शरीरात पोहचतात आणि कँसर सारख्या भयावह रोगाला कारणीभूत ठरतात.


दगड किंवा नग: अनेक लोकं आपल्या घरात डेकोरेटिव दगड, नग, अंगड्या किंवा ताबीज अश्या वस्तू कुठेही ठेवतात. पण या वस्तूमुळे फायदा होतं आहे की नुकसान हे माहीत नसलं तर अश्या वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्या.