शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घराच्या सुख-शांतीसाठी वास्तुशास्त्राचे नियम ठेवा ध्यानात

घराच्या प्रगती आणि सुख शांतीसाठी आपण बरेच काही करतो. घरातील सर्वजण सुखी-समाधानी असतात तेव्हा घरात शांती नांदते. घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी लोक वास्तूच्या नियमांचे पालन करतात. ज्यामुळे घरातील नकारात्कता जाऊन कुटुंबात सकारात्क ऊर्जा येते. आज आपण जाणून घेऊ काही महत्त्वाचे वास्तुनियम जे घर आणि घराच्या प्रगतीसाठी लाभदायक आहेत.
 
घराच्या मध्यभागी जड फर्निचर ठेऊ नये, ब्रह्मस्थळ नेही मोकळे ठेवावे.
 
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने स्वस्तिक काढा. ज्यामुळे नकारात्क ऊर्जा नाहीशी होईल.
 
पाय ओले करून झोपू नका, सुकलेल्या पायाने झोपल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते.
 
घरात काटेरी रोपे लावू नयेत. काटेरी रोपे लावल्याने नात्यात कटुता निर्माण होते.
 
वास्तुशास्त्रानुसार पायर्‍या नेहमी घराच्या कोपर्‍यातून सुरू व्हायला हव्यात. पायर्‍या कोठून सुरू होतात यावरही घरातील बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.