सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (13:07 IST)

काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स

आपल्या घरातील दक्षिण दिशेचे क्षेत्र हे जीवनातील 'प्रसिद्धी' नामक आकांक्षेशी निगडित असते. अग्नी हे या क्षेत्राचे मूलतत्त्व आहे. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तू अथवा लाल रंगाचे चित्र लावणे वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे. असे केल्याने आपली प्रसिद्धी व प्रतिष्ठा वाढते. कारण लाल रंग अग्नी या मूलतत्त्वाचे प्रतीक आहे.
 
वेणीफणी करताना तोंड कधीही पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे नसावे. टॉयलेट्स सहसा दक्षिण, पश्चिम किंवा वायव्येस असावे. घर अशा रीतीने बांधवे की उत्तरेकडचा किंवा पूर्वेकडचा बराचसा भाग मोकळा असावा.
 
घराची फरशी व काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी मीठ मिश्रित म्हणजेच मीठ मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करा. हे पाणी नकारात्मकतेला दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मीठमिश्रित पाण्याने घरातील फरशी पुसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घरात फरशी पुसण्यासाठी पाण्यात शुद्ध न केलेले सागरी मीठ मिसळावे. त्याद्वारे घरातील नकारात्मक प्रभाव व ऊर्जा कमी करता येते.
 
दिवाणखाना वायव्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे असावा. यामुळे स्नेह्यांशी आणि पाहुण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते.
 
बेडरूमच्या खिडक्या ईशान्य दिशेला असाव्यात. बेडरूममधील भिंतीवरची रंगसंगती सौम्य रंगांची असावी. रात्री झोपताना तेथे पूर्ण काळोख नसावा मंद असा प्रकाश असावा.