गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (13:12 IST)

वास्तु टिप्स- आनंदी वैवाहिक जीवनासाठी हे उपाय करावे

astro tips
Vastu Tips- जर कारण नसतांना तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये भांडण होत असेल किंवा अनेकदा प्रयत्न केल्यानंतर पण घरात शांतता होत नसेल तर याचे कारण ग्रहांची बिघडलेली स्थिति आहे. पति आणि पत्नी मध्ये भांडण होवू नये म्हणून या वास्तू टिप्स अवलंबवा   
 
दर रोजच्या वादातून सुटका होण्यासाठी प्रत्येक दिवशी तुळशीला जल अर्पित करणे यासोबत 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करणे.
 
आपल्या बेडरूम मध्ये राधाकृष्ण यांचा फोटो लावणे यामुळे पति पत्नी मध्ये प्रेम वाढते आणि भांडण पण कमी होतात. 
 
रोजचे भांडण होवू नये म्हणून दररोज पिंपळाच्या झाडाची आणि केळच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. 
 
शुक्रवारी एका मातीच्या दिव्यात दोन कापूरचे टुकडे ठेवून प्रज्वलित करणे नंतर पूर्ण घरात याचा धुर फिरवून बाहेर ठेवल्याने दाम्पत्य जीवनात सुख वाढते. 
 
महिलांनी दररोज दुर्गा चालीसाचा पाठ करून दुर्गा देवीचा १०८ नावांचा जप केल्यास वैवाहिक जीवन सुखी होते.