गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Vastu Tips तुम्हीही घरात ठेवता का ताजमहाल? वास्तुनुसार जाणून घ्या शुभ-अशुभ परिणाम

Vastu Tips For Taj Mahal: घर सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण ते अनेक गोष्टींनी सजवतो. पण कधी-कधी आपण सजावटीसाठीही अशा वस्तू वापरतो ज्या वास्तूनुसार अशुभ मानल्या जातात. या गोष्टींमुळे घर सुंदर दिसत असेल, पण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहू लागते. ताजमहालही सुंदर दिसतो. त्यामुळे बरेच लोक ताजमहालचा फोटो किंवा शोपीस घरात सजवण्यासाठी ठेवतात.

ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे बरेच लोक ताजमहालची भेट म्हणून देवाणघेवाण करतात. जर तुम्हीही ताजमहालचा फोटो किंवा शोपीस घरात ठेवला असेल किंवा भेटवस्तू म्हणून त्याचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम माहित असणे आवश्यक आहे.
 
ताजमहालचा फोटो घरात ठेवणे योग्य की अयोग्य.
ताजमहालला घरी ठेवणे अशुभ, कारण जाणून घ्या
ताजमहालला प्रेमाचे प्रतिक मानले जात असले तरी. पण शहाजहानने पत्नी मुमताजचा मृत्यू झाल्यावर ताजमहाल बांधला. शहाजहानने आपल्या पत्नीची कबर ताजमहालमध्ये बांधली. हिंदू धर्मानुसार घरात स्मशान किंवा समाधीचे चित्र ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे ताजमहालचे चित्र किंवा शोपीस घरी ठेवण्यास विसरू नका.
 
भेटवस्तूतही ताजमहालचा व्यवहार करू नका
ताजमहाल म्हणजे थडगी आहे. वास्तुशास्त्रानुसार, समाधी यांसारख्या भेटवस्तू देणे किंवा घेणे टाळले पाहिजे. म्हणूनच कोणीही ताजमहाल भेट म्हणून देऊ नये. ताजमहालचा फोटो किंवा शोपीस कोणाकडून भेट म्हणून मिळाला तरी तो घरी सजवू नका.