गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

महिलांमध्ये एनर्जी वाढवतो अशोक वृक्ष, जाणून घ्या त्याचे 5 फायदे

हिंदू धर्मात अशोकचे वृक्षे फारच महत्त्वाचे आहे. मान्यतेनुसार, ज्या जागेवर अशोकाचे वृक्ष असतात, तिथे कुठल्याही प्रकारचा दुःख किंवा अशांती राहत नाही. म्हणून धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये अशोकच्या पानांचा वापर केला जातो. जर वास्तूनुसार त्याला लावले आणि त्याचा वापर केला तर त्याचे बरेच फायदे आढळून येतात -
 
1. अशोकाचे वृक्ष महिलांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देण्यास यशस्वी असतो. जर महिलांनी अशोकच्या झाडावर रोज पाणी अर्पित केले तर त्यांचा सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच वैवाहिक जीवनात देखील सुख समृद्धी येते.  
 
2. अशोकाचे झाड घरातील उत्तर दिशेत लावायला पाहिजे. ज्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. घरात अशोकाचे वृक्ष असल्यास कायमची सुख, शांती आणि समृद्धी राहते.  
 
3. प्रत्येक शुक्रवारी अशोकच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने मनुष्यच्या जीवनातून निगेटिव्ह एनर्जी दूर होते.  
 
4. ज्या घरातील लोक रोज अशोकच्या झाडाला जल अर्पित करतात तिथे सदैव देवीची कृपा बनलेली असते. असे घर रोग, दु:ख , अशांती सारख्या त्रासांपासून मुक्त असतात. 

5. कुठल्याही शुभ मुहूर्तात अशोकच्या झाडाची जड काढून घ्यावी. नंतर त्याला स्वच्छ पाणी किंवा गंगाजलाने शुद्ध करून आपल्या घरातील देवघरात ठेवून दुर्गा देवीच्या मंत्राने 108 वेळा जप करावे. त्यानंतर या जडला लाल वस्त्र किंवा लाल कपड्याने बांधून शरीरावर धारण केल्याने मनासारख्या कामांमध्ये यश मिळतो.