मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

किचनमधील 5 चुकांमुळे दुखी राहील कुटुंब प्रमुख

स्वयंपाकघर हे पूर्ण कुटुंबाचं केंद्र असतं. येथे कुटुंबातील सदस्य जीवनातील सर्वात उत्तम वेळ घालवतात. शेवटी काय तर मनुष्य पोट भरण्यासाठी तर धावपळ करत असतो. तर वास्तु नियम स्वयंपाकघराबद्दल काय सांगतात. या नियमाप्रमाणे कोणत्या अशा चुका आहे ज्याने कुटुंबातील सदस्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो...तर जाणून घ्या कोणत्या चुका टाळाव्या.
 
किचनमध्ये फुटकी भांडी, कचरा, फालतू सामान, शिळं अन्न अजिबात जमा होऊ देऊ नये.
कामास येत नसलेले किंवा खराब पडलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण लगेच बाहेर करा. याने मुलांच्या करिअरवर प्रभाव पडतो.
सकाळी अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करणे कुटुंबाच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.
किचन आणि बाथरूम आमोर-समोर नसावं. असे असल्यास बाथरूमचं दार नेहमी बंद असावं. किंवा किचनच्या दाराला पडदा लावावा. याकडे दुर्लक्ष केल्यास घरातील प्रमुख व्यक्तीवर अशुभ परिणाम दिसून येतात.
मुख्य प्रवेश दारासमोर किंवा जवळ किचन नसावं. अशात कुटुंबात सामंजस्याची कमी दिसून येते. अशात किचनला पडदा लावणे अत्यंत गरजेचे आहे.