मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : मंगळवार, 16 जानेवारी 2024 (17:45 IST)

बेसनाचे धिरडे; संक्रातीच्या दुसर्‍याची दिवशी करिदिनाला केली जाणारी रेसिपी

besan roti in marathi
साहित्य-
2 कप बेसन
एक कांदा चिरलेला
2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
एक टोमॅटो चिरलेला
1 टीस्पून चाट मसाला
अर्धा चमचा टीस्पून लाल तिखट
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तेल
 
कृती- 
एका भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. आता बेसनात थोडे पाणी घालून त्याचे द्रावण तयार करा. त्यात गुठळ्या पडता कामा नये. यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तव्यावर तेल टाकून ग्रीस करा. नंतर बेसनाचे मिश्रण तव्यावर ओतून चमच्याने गोल व पातळ पसरावे. आता वरील बाजूला तेल शिंपडावे नंतर ते उलटावे. धिरडं दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे सर्व धिरडे तयार करा. गरमागरम  धिरडे सॉस, चटणी किंवा लोणचेसोबत सर्व्ह करा.