शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

भाजणीचे थाळीपीठ (व्हिडिओ पहा)

साहित्य : भाजणीसाठी 1 किलो गहू, अर्धा- अर्धा किलो तांदूळ, चण्याची डाळ,  मुगाची डाळ, उडदाची डाळ, बाजरी, ज्वार. अर्धा- अर्धा वाटी धणे आणि जिरे. 
 
थाळीपीठासाठी : कांदा, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं- लसूण आणि मिरचीची पेस्ट.
 
कृती: सर्व धान्य मध्यम गॅस वर वेगळे वेगळे भाजून घ्या. नंतर पीठ दळून घ्या. अता हवे तितकं पीठ घेऊन त्यात बारीक कापलेले कांदे, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं- लसूण आणि मिरचीची पेस्ट मिसळून पाण्याने मळून घ्या. पाण्याच्या हात लावून हाताने थाळीपीठ थापून घ्या नंतर गरम तव्यावर टाका. थाळीपीठाला मधून भोक करून त्यात आणि चारी बाजूने तेल सोडा. एका बाजूने खरपूस भाजून झाल्यावर पालटून घ्या आणि दुसर्‍या बाजूने पण तेल सोडा. दोन्हीकडून भाजून झाले की चटणी किंवा दहीसोबत सर्व्ह करा.
 
नोट: भाजणीमध्ये आपल्या आवडीप्रमाणे इतर डाळी व कडधान्यही वापरू शकता. थाळीपीठात कांद्याच्या व्यतिरिक्त मेथी, मुळा, भोपळा किंवा इतर भाज्या ही टाकू शकता.