नाश्त्यासाठी बनवा छोले कटलेट रेसिपी
साहित्य-
एक कप -भिजवलेले छोले
एक -कांदा
दोन -हिरव्या मिरच्या
एक चमचा -आले पेस्ट
कोथिंबीर
मिरचीचे तुकडे
एक चमचा -चाट मसाला
अर्धा चमचा -मिरे पूड
ब्रेडचे तुकडे
चवीनुसार मीठ
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात भिजवलेले छोले घ्यावे आता त्यात आल्याची पेस्ट, मिरची, ब्रेडचे तुकडे, मीठ, चाट मसाला आणि काळी मिरे पूड घालावी. तसेच आता आता ते मिक्सरमध्ये टाका आणि पेस्ट बनवा. आता चिरलेला कांदा आणि ब्रेडचे छोटे तुकडे घाला. यानंतर त्यात चार चमचे मैदा घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेसन आणि रवा देखील घालू शकता. तसेच तुम्ही त्यात उकडलेले बटाटे, किसलेले चीज किंवा काजू देखील घालू शकता.आता त्यात थोडे तेल घाला आणि पीठ हातात घ्या आणि त्याला कटलेट किंवा टिक्कीचा आकार द्या. यानंतर ते शॅलो फ्राय करा. जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी ते टिश्यू पेपरवर ठेवा. आता त्यावर चाट मसाला शिंपडावा. तर चला तयार आहे आपली छोले कटलेट रेसिपी, चटणी सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik