1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (19:20 IST)

चविष्ट रेसिपी पोटॅटो ,बनाना बॉल्स विथ पनीर

Delicious recipe potato
साहित्य- 
2 मोठे बटाटे उकडवून मॅश केलेले, 4 कच्ची केळी उकडवून मॅश केलेली, 100 ग्रॅम पनीर,1/2 कप साबुदाण्याचे बारीक दळलेले पीठ,1 -1 चमचा आलं,हिरवी मिरची वाटलेली,काळीमिरपूड, सेंधव मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली ,तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल. 
 
कृती- 
सर्वप्रथम पनीरचे 1-1 इंचाचे तुकडे करून घ्या आणि त्यावर थोडंसं मीठ आणि काळी मिरपूड भुरभुरून द्या. तेल आणि पनीर वगळता सर्व जिन्नस मिसळून गोळे बनवून घ्या जेवढ्या आकाराचे पनीरचे तुकडे आहेत.1 गोळा घेऊन  तळहातावर पसरवून घ्या यामध्ये पनीरचे तुकडे ठेवा आणि बंद करून द्या. 
 
तेल तापवायला ठेवा या मध्ये गोळे घाला आणि सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या . मधून कापून हिरव्या चटणीसह गरम पोटॅटो ,बनाना बॉल्स विथ पनीर सर्व्ह करा.