गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (17:27 IST)

भरवा भेंडीची चविष्ट चमचमीत रेसिपी, आपल्याला नक्कीच आवडेल

जर भेंडीची भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा भिंडीमध्ये नवीन चव घालायची असेल तर आपण  भरवा भिंडी किंवा भरलेली भेंडी करून पाहू शकता. भरवा भिंडीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज नसतानाही ही भाजी काही दिवस चांगली राहू शकते. तसेच आपण आवडीचे आणखी काही मसाले घालू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
 साहित्य: 
भेंडी - 10 
तेल - 1 चमचा 
जिरे - 1/2 चमचा 
किसलेल आलं - 1 इंच 
किसलेल खोबर - 1 चमचा  
बारीक चिरलेली कोथिंबीर - 5 चमचे  
धणे पूड - 1 चमचा 
जिरे पूड  - 1 चमचा  
गरम मसाला पूड - 1 चमचा 
लाल मिरची पूड  - 1/2 चमचा 
आमसूल पूड - 1/2 चमचा 
हरभराडाळीचे पीठ - 1 चमचा 
तेल - 1 चमचा  
 शेंगदाणे कूट - 2 चमचे 
तीळ - 1 चमचा  
मीठ - चवीनुसार
 
 
कृती -  
सारणाचे सर्व साहित्य एका भांड्यात टाकून मिक्स करावे. भिंडी धुवून पुसून घ्या. भेंडीच्या  मध्यभागी कट लावून  त्यात सारण भरावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे व आलं घालावे. त्यात  भरलेली भेंडी हळुवार हाताने पॅनमध्ये ठेवा. हळूच मिक्स करा आणि पॅन झाकून दोन मिनिटे भेंडी शिजवा. दोन मिनिटांनी भेंडी हालवून पुन्हा झाकण ठेवून शिजवा. भेंडीचा रंग बदलून शिजल्यासारखे दिसू लागल्यावर गॅस बंद करा. सर्व्हिंग बाऊलमध्ये भेंडी घाला. कोथिंबीर आणि किसलेल्या खोबऱ्याने सजवा आणि सर्व्ह करा.