1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Get to know the recipe of the delicious jackfruit vegetables

चविष्ट फणसाची भाजी जाणून घ्या रेसिपी

फणसाची भाजी चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. ही भाजी ड्राय आणि ग्रेव्ही यापद्धतीत देखील बनवली जाते. दोन्ही प्रकाराने बनवलेली ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते.  
 
साहित्य- 
250 ग्रॅम फणस, 
अर्धा चमचा जिरे 
अर्धा चमचा मेथी दाणे 
अर्धा चमचा हळद 
गरम मसाला 
हींग 
एक चमचा हिरवी मिरची 
कांदा 
एक चमचा तिखट 
धणे पूड 
चवीनुसार मीठ 
अर्धा कप मोहरीचे तेल 
बारीक चिरलेली कोथिंबीर 
 
कृती-
फणस धुवून बारीक तुकडे करून घ्यावे. मग कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे, कांदा, आले लसूण पेस्ट घालावी. आता या मध्ये मिरची, हळद, तिखट, गरम मसाला, धणे पूड, कोथिंबीर घालावी. तसेच टोमॅटो देखील घालावा. मसाला चांगला परतवला गेल्या नंतर त्यामध्ये फणसाचे तुकडे घालावे. यानंतर चवीनुसार मीठ घालावे. मग तीन ते चार मिनिट झाकून ठेवावे. फणसाचे तुकडे नरम झाले की समजावे भाजी शिजली, भाजी शिजल्यानंतर यावर चिरलेली कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली फणसाची भाजी जी तुम्ही पोळी, पराठा सोबत खाऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
त अक्षरावरून मुलांची मराठी नावे T Varun Mulanchi Nave