रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Paratha For Breakfast: प्रोटीनने भरपूर ट्राय करा बेसन पराठा

जर तुम्हाला बेसन पासून काही वेगळे बनवायचे असेल तर ट्राय करा बेसन पराठा, बेसन पराठा हा चविष्ट तर आहेच पण आरोग्यदायी देखील आहे. ब्रेकफास्ट आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वपूर्ण घटक आहे.म्हणून नेहमी ब्रेकफास्ट मध्ये आरोग्यदायी पदार्थ सहभागी करावे. तर चला आज अशीच नवीन आरोग्यदायी रेसिपी बनवूया. 
 
साहित्य- 
दोन कप बेसन 
चवीनुसार मीठ 
दोन चमचे चिरलेली कोथिंबीर 
एक चमचा हळद 
एक मला कापलेली हिरवी मिरची 
आले पेस्ट 
जिरे 
एक कापलेला कांदा 
आवश्यकतेनुसार तेल 
आवश्यकतेनुसार पाणी 
 
कृती-
बेसन पराठा बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घ्या.  यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालावे.  मग हळद आणि मिरची घालावी. यानंतर आले पेस्ट, जिरे, कापलेला कंदा घालावा. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करावे. तेल आणि पानी घालून आता हे मळून घ्यावे. आता आपल्या हातांना तेल लावून  आणि गोळ्यामधील एक भाग बाजूला करून त्यामध्ये बेसन शिंपडावे. मग आता याचे पराठे लाटून घ्यावे.  आता तूप लावून पराठा शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला बेसन पराठा जी खायलाही चविष्ट लागतो आणि बनवायला देखील अगदी सोप्पा आहे. तुम्ही सॉस, चटणी सोबत खाऊ शकतात.
 
बेसनमध्ये असलेले पोषक तत्व- Nutrition Of बेसन:
बेसनमध्ये प्रोटीन, आयरन, फाइबर, पोटॅशियम, मॅगनीज, अमीनो एसिड, मॅग्नशियम, व्हिटॅमिन b1 आणि फास्फोरस सारखे गुण असतात. जे शरीराला आरोग्यदायी ठेवतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik