बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

नाचणी ओट्स ढोकळा रेसिपी, जाणून घ्या कशी बनवावी

नाचणीला न्यूट्रीशनचे  पावरहाउस संबोधले जाते यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि आयरन मोठ्या प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकात्मक शक्ती वाढण्यास मदत मिळते.  
 
साहित्य-
नाचणीचे पीठ 1 कप
ओट्सची पावडर 1/2 कप
उडीद डाळीचे पीठ 1/2 कप
दही 1 कप
पाणी 1 कप
मोहरी 1/2 चमचे 
कढी पत्ता 8 ते १०
आले पेस्ट 1/2 चमचे 
बेकिंग सोडा 1/2 चमचे 
हिरवी मिर्ची पाच ते सहा 
 
कृती-
एका बाऊलमध्ये नाचणीचे पीठ घ्यावे, व त्यामध्ये ओट्स पावडर आणि उडदाचे पीठ घालावे. आता यामध्ये दही मिक्स करून काही वेळ हलवावे.  एक घट्ट पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
बॅटर तयार झाल्यानंतर 6 ते 8 तास झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी यामध्ये मीठ, तिखट, हळद घालावी. तसेच चिमूटभर बेकिंग सोडा घालावा. तसेच आले पेस्ट घालावी.
 
या मिश्रणात एका चमचा वेजिटेबल ऑयल मिक्स करावे. आता एका ताटलीला तेल लावावे. व त्यामध्ये हे मिश्रण घालून स्टीम होण्यासाठी ठेवावे. 10 ते 15 मिनट पर्यंत स्टीम झाल्यानंतर चेक करावे. दुसरीकडे  कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता टाकने फोडणी तयार करावी. तयार झालेला ढोकळा हा कट करून त्यावर ही फोडणी घालावी. तसेच तुम्ही हा ढोकळा चिंचेची चटणी, पुदिना चटणी सोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik