आरोग्यदायी शहतूत(तुतीचा) जॅम, कसा बनवावा जाणून घ्या रेसिपी
सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक, शांत करण्यासाठी पराठा, पोळी यांसोबत जॅम नेहमी आपल्या कमी येतो लहान मुलांना जॅम मोठ्या प्रमाणात आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का शहतूत(तुतीचा) जॅम इतर फळांच्या जॅम पेक्षा वेगळा आणि चविष्ट असतो. शहतूत(तुती)न्यूट्रिएंट्स ने भरपूर असतात. शहतूत मध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, सोडियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, यांसारखे अनेक पोषक तत्वे असतात.
शहतूत(तुतीचा) जॅम
साहित्य-
800 ग्रॅम ताजे शहतूत(तुती)
5 कप खांड
1/2 कप लिंबाचा रस
चिमूटभर जायफळ पूड
कृती-
सरावात आधी गॅस वर पॅन ठेऊन त्यामध्ये शहतूत, खांड, लिंबाचा रस घालावा. व मध्यम गॅस वर ठेवावे. त्यानंतर 20 मिनिटापर्यंत शिजवावे. हे मिश्रण हळू हळू घट्ट होण्यास सुरवात होईल. मग त्यामध्ये जायफळ फूड घालावी. यानंतर जॅम थंड होण्यासाठी ठेवावा. तसेच थंड झाल्यानंतर तुम्ही हा जॅम फ्रिजमध्ये पाच ते सहा महिन्यांपर्यंत स्टोर करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik