शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (14:42 IST)

डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

mung
रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला का? तुम्हाला मी माहित आहे का हिरव्या मुगाची भाजी सुद्धा चविष्ट लागते तसेच अगदी सोप्पी सुद्धा आहे. तसेच हिरव्या मुगाची भाजी ही चविष्ट तर लागतेच पण पोषण युक्त देखील असते. तसेच ही भाजी तुम्ही पोळी, पराठा यांसोबत देखील खाऊ शकतात. तर चला लिहून घ्या हिरव्या मुगाची भाजी रेसिपी 
 
साहित्य-
एक कप हिरवे मूग 
दोन टोमॅटो 
एका चमचा आले पेस्ट 
शुद्ध तूप 
मीठ 
जिरे 
मोहरी 
हिंग 
हिरवी मिरची बारीक कापलेली 
अर्धा चमचा छोले मसाला 
हळद 
आमसूल पावडर 
तिखट 
गरम मसाला 
 
कृती-
सर्वात आधी मूग अर्धा तासासाठी भिजवून ठेवा. मग एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावे. आता कढईमध्ये शुद्ध तूप घालून जिरे घालावे. तसेच हिंग, आले पेस्ट घालावी. नंतर टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजतांना मसाला घालावा. सोबत मीठ, आमचूर पावडर, जिरे पूड, मग मूग घालावे व परतवावे. तर चला तयार आहे आपली हिरव्या मुगाची चविष्ट आणि पौष्टिक भाजी, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik