Besan Dosa कुरकुरीत बेसन डोसा रेसिपी
साहित्य-
अर्धा कप बेसन
अर्धा कप रवा
२ कप पाणी
२ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
२ टेबलस्पून बारीक चिरलेला गाजर
अर्धा इंच किसलेले आले
२ बारीक चिरलेली लसूण पाकळ्या
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
कोथिंबीर
१/४ टेबलस्पून काळी मिरी पावडर
१/४ टीस्पून जिरे
मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
तेल
कृती-
सर्वात आधी बेसन एका मोठ्या भांड्यात नीट चाळून घ्या, नंतर त्याच भांड्यात रवा चाळून घ्या. आता १ कप पाणी घाला आणि सर्वकाही नीट मिसळा. हे मिश्रण २ मिनिटे फेटून घ्या आणि एक गुळगुळीत, थोडे जाडसर पीठ तयार होईल. नंतर कांदा, गाजर, किसलेले आले, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर घाला. आता, जिरे, मीठ, लिंबाचा रस आणि एक कप पाणी घाला आणि सर्वकाही नीट मिसळा. यानंतर पॅनवर तेल पसरवा. आता पॅनवर पीठ पसरवा. कमी ते मध्यम आचेवर शिजू द्या. बेसन डोसाच्या वर तेल पसरवा, ते उलटा करा आणि दुसरी बाजू देखील शिजवा. तर चला तयार आहे कुरकुरीत बेसन डोसा रेसिपी, चटणीसोबत गरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik