शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (18:49 IST)

पालक पराठा बनवण्यासाठी पीठ आणि पुरी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

गरमागरम आणि चविष्ट पराठे खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. हिवाळ्यात तर याची चव दुप्पट होते. थंडीची सकाळ सुरू करण्यासाठी पालक पराठे हा एक चांगला पर्याय आहे. या चविष्ट पराठ्याचा पूर्ण स्वाद घेण्यासाठी ते योग्य प्रकारे तयाार करणे आवश्यक आहे. तर जाणून घ्या पालक पराठा बनवण्याच्या सोप्या टिप्स-
 
साहित्य
पालकाची पाने, पाणी, आले, हिरवी मिरची, गव्हाचे पीठ, ओवा, चवीनुसार मीठ, तेल, पाणी, तेल किंवा तूप
 
पालक पराठा प्युरी कशी बनवायची?
एका मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घालून एक उकळी आणा. नंतर धुतलेली पालकाची पाने टाका आणि उकळू द्या. पालक गार झाल्यावर ब्लँडरमध्ये आले आणि मिरच्या सोबत ब्लँच केलेला पालक टाका आणि प्युरी बनवा.
 
पीठ कसे बनवायचे
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. नंतर त्यात ओवा, मीठ आणि तेल टाका.आता तयार पालक प्युरी घाला. पालक प्युरी समान प्रमाणात मिसळली आहे याची खात्री करा. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मऊ मळून घ्या. पीठ थोडे तेलाने ग्रीस करा. नंतर पीठ ओल्या कापडाने झाकून 30 मिनिटे बाजूला ठेवा.
 
पालक ब्लँच करण्याऐवजी पीठ मळताना बारीक चिरलेला पालक देखील वापरू शकता. उत्तम चवीसाठी पालकाची ताजी पाने वापरा. तुपात बनवलेले पालक पराठे खूप छान लागतात.
 
या चुका करू नका
पालक जास्त उकळू नका अशाने त्यातील पोषक घटक गमावू शकतात. तसेच पीठ मळताना पुरेसे पाणी घाला. जास्त पाणी घालण्याची चुक करु नका. पराठे जास्त वेळ साठवून ठेवू नका कारण त्याची चव कमी होईल. तुम्ही तयार केलेले पीठ 2 दिवसांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ते खावेसे वाटेल तेव्हा ताजे शिजवा आणि गरम पराठे खा.