गुरूवार, 23 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:04 IST)

Christmas Recipes : ख्रिसमस पार्टीसाठी झटपट बनवा बेक्ड पॉटेटो चिप्स

बेक्ड पोटेटो चिप्स (Baked Potato Chips) एक सोपी स्नॅक रेसिपी पर्याय आहे. ही रेसिपी आपण आपल्या मित्रांसाठी ख्रिसमस पार्टीसाठी तयार करु शकता. या रेसिपीसाठी केवळ 3 साहित्यची गरज लागेल. ही सर्वात सोपी पार्टी ट्रीट आहे. बेक्ड बटाटे तळलेल्या चिप्सच्या तुलनेत अधिक हेल्दी असतात. यात सोडियमचे प्रमाण देखील कमी असतं कारण या रेसिपीमध्ये मिठाचा वापर केला जात नाही. हल्ली बाजारात जागोजागी चिप्स मिळतात परंतु त्यात अती प्रमाणात मीठ असतं जे आरोग्यासाठी योग्य नाही. या चिप्स रेसिपीमध्ये केवळ मिक्स हर्ब्स असतात ज्यामुळे याला स्वाद येतो. जर आपण विचार करत असाल की किटी पार्टी किंवा गेम नाइट्समध्ये आपल्या मित्रांसाठी काय तयार करावं तर ही स्नॅक रेसिपी आपण ड्रिंक्ससह सर्व्ह करु शकता. जाणून घ्या कृती-
 
बेक्ड पोटेटो चिप्स बनव‍ण्यासाठी साहित्य
बटाटे – 4
मिक्स हर्ब्स – 2 मोठे चमचे
व्हर्जिन ऑल्विह ऑयल – 2 मोठे चमचे
 
बेक्ड पोटेटो चिप्स तयार करण्याची कृती- 
बटाटे पाण्याने धुऊन घ्या. नंतर याला सोलून मोठ्या बाऊलमध्ये पातळ-पातळ काप करुन घ्या. नंतर या स्लाइसवर वरुन व्हर्जिन ऑल्विह ऑयल टाका. नंतर चांगले मिसळून मिक्स हर्ब्स शिंपडा. आपण याला दोन चमच्यांनी किंवा हातांनी टॉस करु शकता. आता ओव्हन 180 डिग्री सेल्सियसवर 10 मिनिटासाठी प्रीहीट करा.
 
नंतर एक बेकिंग ट्रे घ्या आणि कागदाने झाकून द्या. नंतर बटाट्याच्या स्लाइस मधून जागा सोडत ट्रे वर ठेवा. लवकरच बेकिंग ट्रे ला आधीपासून गरम केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा आणि चिप्स 10-15 मिनिटांसाठी 200 डिग्री सेल्सियस पर्यंत क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होयपर्यंत बेक करुन घ्या.
 
शिजल्यावर यांना काढून गरम सर्व्ह करा. आपण जरा मीठ आणि मिरपूड घालून स्वाद वाढवू शकता.