सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

घरी बनवा रेस्टोरेंट सारखे मशरूम फ्राय, रेसिपी जाणून घ्या

अनेकांची इच्छा असते की, लंच किंवा डिनर मध्ये त्यांना काही वेगळे खायला मिळेल. असे केल्याने जेवणाचा स्वाद बदलतो. चविष्ट आणि हेल्दी भाजी असल्यास जेवताना देखील चांगले वाटते. अशीच एक भाजी आहे मशरूम. लोक मशरूम खूप आवडीने खातात. चला तर मग घरीच बनवू या रेस्टोरेंट सारखे मशरूम फ्राय लिहून घ्या रेसिपी. 
 
साहित्य 
बटन मशरूम - 300 ग्राम 
चिरलेला कांदा - 2-3 
चिरलेले  टोमॅटो - 2 
आले-लसूण पेस्ट- 2 टी स्पून 
जीरे- 1 टी स्पून 
मोहरी- 1 टी स्पून 
मेथी दाने - 1/3 टी स्पून 
हळद- 1 टी स्पून 
लाल मिरची पाउडर - 1 टी स्पून 
धणे पाउडर - 1 टी स्पून 
गरम मसाला - 1/3 टी स्पून 
चिरलेली हिरवी कोथिंबीर - 2 टेबल स्पून 
तेल-गरजेप्रमाणे  
मीठ - चवीनुसार
 
कृती 
मशरूमला मिठाच्या पाण्यात धुवून घ्यावे. मग मशरूम  कापून एका स्वच्छ भांड्यात ठेवावे. कढईत तेल टाकून त्यात मोहरी, जीरे, मेथीदाने घाला. व त्यात चिरलेला कांदा,  टोमॅटो आणि लसूण पेस्ट टाकून 2 मिनिट परतून  नंतर तिखट, धणे पावडर आणि इतर मसाले टाकून परतून घ्या . मग यात चिरलेले मशरूम घालून परतून घ्या. भाजी शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवा. थोडया वेळाने पाणी टाकून झाकण ठेऊन 10 ते 15 मिनिट लहान गॅस वर ठेवा. भाजी शिजल्यावर यात गरम मसाला टाकून गॅस बंद करून मग कोथिंबीर टाकून सजवून सर्व्ह करा..
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik