गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)

Breakfast special : ओनियन पराठा रेसिपी

साहित्य-
पीठ - दोन कप
तिखट -अर्धा चमचा 
कांदा- दोन 
ओवा- अर्धा चमचा 
आले लसूण पेस्ट- एक चमचा 
तूप- चार चमचे 
हिरवी मिरची- दोन 
चाट मसाला - एक चमचा 
कोथिंबीर 
चवीनुसार मीठ 
 
कृती-
ओनियन पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातीमध्ये पीठ घ्यावे. व त्यामध्ये मीठ, ओवा, तेल आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावे. व बाजूला ठेऊन द्यावे. आता कांदे घेऊन बारीक चिरून घ्यावे. आता यामध्ये मीठ मिक्स करून पाच मिनिटांकरिता ठेऊन द्यावे. आता कांद्याने पाणी सोडल्यानंतर हाताने चिरलेला कांदा पिळून घ्यावा व त्यामधील सर्व पाणी काढून घ्यावे. आता यामध्ये तिखट, ओवा, आले लसूण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कोथिंबीर आणि मीठ मिक्स करावे. कणकेचे छोटे छोटे गोळे करून हे मिश्रण भरावे व लाटून घ्यावे. आता तव्यावर हा पराठा दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.  तर चला तयार आहे आपला ओनियन पराठा जो तुम्ही लोणचे किंवा चटणी सोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik