झटपट बनणारे मुळ्याचे पराठे
साहित्य-
मुळा
गव्हाचे पीठ
हळद
चिमूटभर हिंग
जिरे
धणेपूड
तिखट
कोथिंबीर बारीक चिरलेली
हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे
तेल
कृती-
सर्वात आधी मुळा स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्या. व आता हा मुळा किसून घ्यावा. तसेच किसलेल्या या मुळयामधील पाणी हाताने किस दाबून काढून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. आता तेलामध्ये जिरे, हिंग, हळद घालावे.आता यामध्ये मुळ्याचा किस, मीठ, धणेपूड, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घालावी. तसेच तिखट घालून हे मिश्रण परतवून घ्यावे. तसेच गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालून पीठ मळून घ्यावे. तसेच काही वेळ कणिक भिजू द्यावी. आता कणकेचा गोळा घेऊन एक पातळ पोळी लाटून घ्यावी. तसेच परत दुसरी पोळी देखील लाटून घ्यावी. आता पहिल्या पोळीवर मुळ्याचे बनवलेले मिश्रण घालावे. व व्यवस्थित पसरवून घ्यावे. आता वरतून दुसरी पोळी ठेवावी. व कीरे हाताने दाबून बंद करावे.आता पीठ लावून पोळी थोडी मोठी लाटून घ्यावी. आता ही पोळी तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी. तर चला तयार आहे आपलाझटपट असा मुळ्याचा पराठा, जो तुम्ही सॉस किंवा चटणी सॊबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik