गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Palak Paratha हिवाळ्यात खा गरमागरम पौष्टिक पालक पराठा

Palak Paratha हिवाळ्यात पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पालकामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पालक आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पालकला चविष्ट रुपात खाण्यायासाठी आपण पालक पराठा तयार करु शकता-
 
पालक पराठ्याचे साहित्य - अर्धा कप गव्हाचे पीठ, 200 ग्रॅम पालक उकडून घेतलेला, 2 चमचे लसूण-मिरची पेस्ट, तेल, चवीनुसार मीठ
 
कृती- सर्वप्रथम एका उकडलेल्या पालकाची पाने घेऊन त्यात लसूण आणि मिरची घालून प्युरी तयार करा. एका परातीत पीठ घेऊन त्यात मीठ, तेल आणि तयार पालक प्युरी घाला. हे सर्व मिसळून कणिक मळून घ्या. आता एक गोळा घेऊन पराठा लाटा. गरम तव्यावर शेकून दोन्ही बाजूने तेल लावून आवडीप्रमाणे कुरकुरीत करुन घ्या. लोणचे किंवा सॉससोबत सर्व्ह करा.