शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

मायाळूच्या पानांची पातळ भाजी

साहित्य : दोन वाट्या मायाळूची पानं, वाटीभर ओलं खोबरं, पाव वाटी तूरडाळ, तीन हि. मिरच्या, ४ मिरे, दोन-तीन लसूण पाकळ्या, चमचाभर तांदूळ, २ कोकम.
 
कृती : मायाळूची पानं देठासहित खुडून घ्यावीत व स्वच्छ धुवावीत. पाणी पूर्ण निथळल्यावर देठाचे छोटे तुकडे करावेत व पानं बारीक चिरावीत. खोबरे, मिरच्या, लसूण, मिरे व भिजलेले तांदूळ एकत्र वाटावेत.
 
कुकरमध्ये पाण्यात डाळ त्यावर देठ व थोडे मीठ आणि त्यावर चिरलेली पानं घालावीत व शिटी करून भाजी, डाळ शिजवून घ्यावी. मग त्यात मसाल्याचे वाटण, मीठ व दोन कोकम, आमसुले घालावीत व डावाने हलवावे. ही भाजी दाटसरच असते. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. कैरीच्या दिवसात कोकमाऐवजी कैरी घालूनही ही भाजी केली जाते व छान लाग