शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

उन्हाळा स्पेशल : चटपटीत भेळ

साहित्य : दोन वाट्या चुरमुरे, प्रत्येकी एक छोटी काकडी, टोमॅटो, कांदा, उकडलेला बटाटा, मूठभर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, अर्धी गोडसर कैरी, मीठ, १/२ वाटी मोड आलेले अन् वाफवलेले मूग, चाट मसाला, शेव, साखर, आणि आवडत असल्यास खारे दाणे. 
 
कृती : सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्याव्यात. ऐनवेळी चुरमुऱ्यामधे वाफवलेले मूग, सगळ्या भाज्या, मीठ, थोडा चाट मसाला, पुदिन्याची पानं, खारे दाणे, साखर असं सगळं साहित्य झटपट एकत्र करावं. वरून कोथिंबीर, शेव आणि चाट मसाला घालावा. 
 
सर्व भाज्या, कैरी, पुदिना आणि कोथिंबिरीमुळे ही भेळ नुसतीच टेस्टी होत नाही, तर पौष्टिकही होते.