रेस्टॉरंटसारखे चविष्ट पालक पनीर घरीच बनवा; लिहून घ्या रेसिपी
साहित्य-
पालक- ५०० ग्रॅम
पनीर-२५० ग्रॅम
हळद - अर्धा टीस्पून
लाल तिखट-अर्धा टीस्पून
गरम मसाला-अर्धा टीस्पून
टोमॅटो-दोन
कांदा-एक
हिरवी मिरची
आले-लसूण पेस्ट-एक टीस्पून
जिरे-अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तूप किंवा तेल- दोन टीस्पून
पाणी-अर्धा कप
क्रीम- दोन टीस्पून
कृती-
सर्वात आधी पालक चांगले धुवून उकळवा. त्याचा हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी थंड पाण्यात टाका. नंतर पालक बारीक करा आणि प्युरी बनवा. पनीरचे छोटे तुकडे करा आणि हलके तळा. पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. जिरे घाला, नंतर चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता आले-लसूण पेस्ट घाला आणि १-२ मिनिटे परतून घ्या. आता टोमॅटो प्युरी घाला आणि परतून घ्या, नंतर हळद, लाल तिखट आणि मीठ घाला आणि चांगले शिजवा. आता पालक प्युरी घाला आणि चांगले मिसळा. ते ५-७ मिनिटे शिजू द्या. आता पनीरचे तुकडे आणि क्रीम घाला आणि ५ मिनिटे शिजू द्या. गरम मसाला घाला आणि चांगले मिसळा आणि हिरव्या कोथिंबीरने गार्निश करा.
तर चला तयार आहे आपले अगदी रेस्टॉरंटसारखे क्रिमी पालक पनीर रेसिपी, गरम पोळी, पराठेसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik