सोप्या पद्धतीने बनवा तांदळाचा पापड रेसिपी
साहित्य-
एक कप - तांदळाचे पीठ
दोन - कप पाणी
अर्धा टीस्पून ओवा
चवीनुसार मीठ
एक टीस्पून - तेल
कृती-
सर्वात आधी पाण्यात मीठ आणि तेल गाळावे आणि त्याला उकळी आणावी. त्यानंतर
त्यात हळूहळू तांदळाचे पीठ आणि ओवा घाला आणि सतत ढवळत राहा. आता मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. छोटे गोळे बनवा आणि त्यांचे पापड लाटून उन्हात वाळवा. पापड वाळल्यानंतर तेल गरम करून पापड तळून घ्या. तसेच त्यांना हवाबंद डब्यात देखील ठेऊन शकता. तर चला तयार आहे आपले तांदळाचे पापड रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik