मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (23:08 IST)

Roti Samosa Recipe :रोटी पासून बनवा चविष्ट रोटी समोसा साहित्य आणि कृती जाणून घ्या

Roti Samosa Recipe :  प्रत्येक भारतीय घरात दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी पोळ्यांना प्राधान्य दिले जाते. खाणे जितके सोपे आहे तितके ते अधिक पौष्टिक आहे. प्रत्येकाला गरमागरम पोळ्या खायला आवडतात.कधी कधी जास्त पोळ्या शिल्लक राहिल्या की त्यांना टाकणे देखील जीवावर येते. आम्ही तुम्हाला उरलेल्या रोट्यांमधून चविष्ट समोसे कसे बनवायचे ते सांगत आहो.समोसे खायला जवळपास सगळ्यांनाच आवडतात.चला तर मग साहित्य आणि  कृती जाणून घ्या .

साहित्य -
पोळ्या  - 4
उकडलेले बटाटे - 2-3
बेसन - 3 टीस्पून
हिरवी मिरची चिरलेली - 2
लाल तिखट - 1/2 टीस्पून
गरम मसाला -1/2 टीस्पून
कलोंजी -1/2 टीस्पून
हिरवी धणे पाने - 2-3 चमचे
तेल - तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
 
कृती
 
रोटी समोसे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकळवून थंड करून घ्या. आता ते सोलून चांगले मॅश करा. यानंतर एका कढईत तेल टाका, त्यात बडीशेप आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये टाकून काही मिनिटे चांगले परतून  घ्या. 
 
यानंतर, आता त्यात सर्व मसाले आणि मीठ घालून चांगले मिसळा. ते तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका. आता ते बाजूला ठेवा आणि थंड करा.
समोसे चिकटवण्यासाठी बेसनाचे जाडसर पीठ तयार करा. यानंतर रोटी मधोमध कापून घ्या. आता एक तुकडा घ्या आणि त्यातून एक कोन  बनवा आणि त्यात बटाटा भरून घ्या. शेवटी त्याला समोशाचा आकार द्या आणि बेसनाच्या द्रावणाच्या मदतीने चिकटवा. आता कढईत तेल गरम करून त्यात रोटी समोसे तळून घ्या. गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करा. 




Edited by - Priya Dixit