बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जानेवारी 2025 (16:52 IST)

टेस्टी मिक्स फ्रूट जॅम रेसिपी

Fruit Jam
साहित्य- 
तुमच्या आवडीची फळे एक किलो 
साखर  
लिंबाचा रस  
पाणी  
सायट्रिक एसिड 
कृती-
मिक्स फ्रूट जॅम बनवण्यासाठी सर्वात आधी फळे स्वच्छ धुवून घ्यावे. लहान फळे अर्धी   कापून घ्या आणि मोठ्या फळांचे तुकडे करून घ्यावे.  यानंतर, एका मोठ्या पॅनमध्ये फळे आणि साखर घालावी. जर फळांमधून जास्त रस निघत नसेल तर थोडे पाणी घाला. आता मध्यम आचेवर ठेऊन  सतत ढवळत राहावे. जेव्हा फळे मऊ होतात आणि मिश्रण घट्ट होऊ लागते. आता गॅस बंद करावा. तयार मिश्रण थंड झाल्यावर  ब्लेंडरमध्ये घाला आणि गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.  आता  मिश्रण परत पॅनमध्ये घाला आणि मध्यम आचेवर शिजवून घ्यावे. आता सतत ढवळत राहा आणि मध्ये मध्ये चमच्याने मिश्रण तपासा. आता घट्ट झालेल्या मिश्रणात लिंबाचा रस घाला. यामुळे जॅमची चव वाढेल.तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सायट्रिक एसिड देखील घालू शकता. आता जाम पूर्णपणे थंड होऊ द्यावा. स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये जाम भरावा. झाकण घट्ट बंद करा आणि जार रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. तर चला तयार आहे आपला फळांचा जॅम रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik