Marathi Biodata Maker
✕

पावसाळ्यात हटके आणि चविष्ट सामोस्यांचे प्रकार नक्की ट्राय करा

Updated: बुधवार, 8 जुलै 2026 (16:04 IST)
चिझी कॉर्न आणि कॅप्सिकम सामोसा
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता असणारा हा फ्युजन सामोसा प्रकार आहे.
सारणाचे साहित्य- १ कप उकडलेले मक्याचे दाणे (Sweet Corn), अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची, १ कप किसलेले मोझरेला किंवा प्रोसेस चेद्दार चीज, १ चमचा चिली फ्लेक्स, १ चमचा ओरिगॅनो, चवीनुसार मीठ.

कृती- एका बाऊलमध्ये उकडलेला कॉर्न, सिमला मिरची, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि मीठ एकत्र करून घ्या. मिश्रण थोडे थंड असावे, त्यात भरपूर किसलेले चीज मिक्स करा. हे सारण सामोसा पट्टीत भरा. (लक्षात ठेवा, चीज वितळून बाहेर येऊ नये म्हणून सामोस्याच्या कडा मैद्याच्या पेस्टने व्यवस्थित बंद करा). गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. टोमॅटो केचअपसोबत हा सामोसा अप्रतिम लागतो.

चायनीज नूडल्स सामोसा
जर तुम्हाला चायनीज खायला आवडत असेल, तर हा सामोसा तुम्हाला नक्कीच वेड लावेल.
सारणाचे साहित्य-१ कप उकडलेले नूडल्स, अर्धा कप उभा चिरलेला कोबी, पाव कप गाजर आणि सिमला मिरची, १ चमचा शेजवान सॉस, १ चमचा सोया सॉस, १ चमचा विनेगर, बारीक चिरलेला लसूण आणि तेल.

कृती- कढईत तेल गरम करून लसूण आणि सर्व भाज्या हाय फ्लेमवर (मोठ्या आचेवर) १-२ मिनिटे परतून घ्या (भाज्या जास्त शिजवू नका, क्रंची राहू द्या). त्यात उकडलेले नूडल्स, सोया सॉस, शेजवान सॉस, विनेगर आणि हलके मीठ घालून चांगले टॉस करा. हे चायनीज सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. सामोस्याच्या पाटीमध्ये हे नूडल्सचे सारण भरून सामोसे पॅक करा आणि कडकडीत तेलात तळून घ्या. शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.

गरमागरम मटार कचोरी-सामोसा
पावसाळ्यात बाजारात येणाऱ्या ताज्या हिरव्या मटारपासून बनवलेला हा पारंपरिक आणि खमंग प्रकार आहे.
सारणाचे साहित्य-१.५ कप ताजे हिरवे मटार, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि मीठ.

कृती- हिरवे मटार आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर (दरदरीत) वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंगाची फोडणी द्या. त्यात वाटलेले मटार घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर परता. नंतर धने पावडर, आमचूर पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतून घ्या. हे खमंग सारण सामोशामध्ये भरून ते तळून घ्या. पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत हा सामोसा खाताना मस्त पाऊस एन्जॉय करा.
ALSO READ: भजी-चहापेक्षा काहीतरी वेगळं! पावसाळ्यात ट्राय करा 'हे' ५ गरमागरम आणि हेल्दी सूप्स
सामोस्याचे बाहेरील कव्हर (पीठ) मळताना त्यात थोडे गरम तेल (मोहन) आणि १ चमचा रवा आवर्जून घाला. तसेच सामोसे तळताना घाई न करता नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळा, यामुळे सामोसे दीर्घकाळ कुरकुरीत राहतात आणि त्यांना फोड येत नाहीत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पावसाळ्यात मैद्याऐवजी बेसन वापरून घरीच हलवाई-स्टाईल कुरकुरीत जिलेबी बनवा, पाककृती अत्यंत सोपी
Edited By- Dhanashri Naik
<>
About Author
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

"कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्तावर चंद्र देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य थाळी''

उकडलेली अंडी, ऑम्लेट की भुर्जी? अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या फायदे!

LLM Constitutional Law मध्ये करिअरची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेज, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments