सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

बटाटा मेथी

साहित्य : 4 जुडी निवडलेली मेथी, 8 पाकळ्या लसूण, 2 कापलेले कांदे, 1 तुकडा आलं बारीक काप केलेला, 1/2 चमचा हळद, 4 मोठे चमचे तेल, 4 बटाटे उकळून सोलून त्याचे काप करावे, 1/2 चमचा मोहरी, 4 टोमॅटो चिरलेले, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ. 

कृती : सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण, आलं व हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे. हळद, तिखट, मीठ टाकून 2 मिनिट परतून घ्यावे. नंतर टोमॅटो व मेथी घालावी, 5 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. ही भाजी परोठे सोबत सर्व्ह करावी.