उपासाचे दाण्याचे रायते
सौ. दिप्ती प्रधान
साहित्य- अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तूप, अर्धा चमचा जिरे, दोन वाट्या दही, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ कृती- शेंगदाणे 4 ते 5 तास भिजत घालावे. चांगले भिजलेले शेंगदाणे उकडून घ्यावे. कुकर मध्ये उकडल्यास 2 शिट्ट्या काढाव्या. भांड्यात फोडणीसाठी तूप घालावे. ते तापले की मिरच्या व जिरे घालावे. मिरचीचा रंग बदलला की दोन वाट्या फेटलेले दही घालून गॅस बंद करावा. मीठ साखर व उकडलेले शेंगदाणे घालावे. छान एकत्र करून अर्धातास फ्रिज मध्ये ठेवून मग सर्व्ह करावे.सजावट - आवडत असल्यास कोथिंबीर व डाळींबाचे दाणे घालून सजावट करावी.