सोमवार, 6 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2011 (17:48 IST)

कांदा भरीत

कांदा भरीत तिखट साखर
MHNEWS
साहित्य:- मोठे कांदे ४, लाल तिखट अर्धा चमचा, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिबीर २ चमचे, गोड दही १ वाटी, तेल १ डाव, चवीनुसार मीठ.

कृती:- गॅसवर कांदे भाजून घ्या. भाजले कांदे थोडावेळ पाण्यात घाला. नंतर कांद्याची वरची जळकट सालपट काढून कांदा उभा चिरा. बाऊलमध्ये कांद्यात तेल सोडून वरील सर्व साहित्य मिक्स करा. गॅसवर कोळसा लाल झाल्यावर कांद्यात ठेवून वरून थोडं तेल टाका. पटकन झाकणी त्यावर झाका. निखाऱ्याचा धूर कांद्यात मुरला पाहिजे. जरा वेळाने कोळसा बाहेर काढा. पोळी, पराठ्यासोबत सर्व्ह करा.