शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

कॉर्न कटलेट

- प्रीता गडकरी

कॉर्न कटलेट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1/2 किलो बटाटे, 3 वाट्या कॉर्न कीस, 2 भोपळी मिरच्या, मीठ, मिरपूड, 8-10 मिरच्या, 5-6 ब्रेड स्लाइस, थोडासा रवा व तेल.

कृती : बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्यावे. कॉर्न किसून घ्यावे, नंतर वाटीने मोजून, कुकर मध्ये वाफवून घ्यावा. भोपळी मिरच्या
किसून घ्या व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या.

ब्रेडच्या स्लाइसचा कुस्करा करून सर्व साहित्य एकत्र करावे, त्यात मीठ, मिरपूड घालून मिश्रण तयार करावं. त्याचे गोळे करून जरा चपटे
करावे. त्या गोळ्यांना सर्व बाजूने रवा लावून, तव्यावर थोडे तेल घालून फ्राय करावे.