गाजर स्टिक्स
MH News
MHNEWSसामुग्री: एकाच आकाराच्या मध्यम-जाडसर अशा तीन-चार गाजरांचे वाफवून उभे काप करावे. दोन अंडयांचे पांढरे फेटून बलक, अर्धा कप गव्हाच्या ब्रेडचा चुरा, अर्धा कप साय काढलेल्या दुधाचे ताजे दही, मीठ, मिरपूड चवीनुसार.
कृती: सर्वप्रथम गाजरे वाफवून घ्यावी आणि अंडयाच्या फेटलेल्या मिश्रणात बुडवावी. त्यात थोडे मीठ घालावे. नंतर गाजरे ब्रेडच्या चुर्यात घोळवावीत. नॉनस्टिक पॅन मंद आचेवर ठेवून त्यात दीड चमचा तेल घालावे. तयार गाजराचे काप अलगद भाजावे. खमंग परतावे. घाई करू नये.
दही, मीठ, मिरपूड, जिरेपूड एकत्र करावी. खमंग गाजराचे काप ताटलीमध्ये मांडून त्यावर दह्याचे मिश्रण घालावे. हिरवेगार कोथिंबीर सजवून खायला द्यावे.
यामुळे उष्मांक कमी करता येतात. हा पदार्थ चविष्ट व पौष्टिक आहे. उत्तम दर्जाची प्रथिने व फायबरयुक्त अन्न मिळते. अगदी झटपट होणारा हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो. विशेषत: फिटनेसकडे लक्ष देणारी लोक मोठय़ा हॉटेलातून देखील ऑर्डर करतांना दिसतात. एखाद्या मस्त संध्याकाळी हा पदार्थ करण्यास हरकत नाही.
(महान्यूज)
