1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
  6. पंजाबी स्वादिष्ट दाल

Recipe in Marathi, veg Recipe, Nonveg Recipe, Pakkruti in Marathi | पंजाबी स्वादिष्ट दाल

राजश्री शिन्दोरे

चणाडाळ
WD
साहित्य : अर्थी वाटी चणाडाळ, एक दुधी भोपळा, दोन कांदे किसून, दोन टोमॅटो किसून, कोथिंबीर, पंजाबी गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, अर्धा इंच आले, तेल, मोहरी, जिरे, आमचूर.

कृती : सर्वप्रथम चणाडाळ, दुधीचे तुकडे, हळद, मीठ घालून हे सर्व कुकरमध्ये शिजवा. नंतर तेलाची फोडणी करा. त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. किसलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता. मग त्यात शिजलेली डाळ, पंजाबी गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, आमचूर घाला. एक उकळी आली, की वरून भरपूर कोथिंबीर व बटर घाला. ही दाल गरम भाताबरोबर खायला द्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा