शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2016 (15:31 IST)

फुलकोबीचे भरीत

veg recipe
साहित्य - फूल कोबी - 1 किलो, मटर- 1/2 कप, तेल- 1 कप, कांदा - 1, टोमॅटो - 2, लसूण - 6 पाकळ्या, आलं - 2 इंच पीस, लिंबाचा रस चमचा, हिरव्या मिरच्या - 3, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ - चवीनुसार, तिखट - 1 चमचा, हळद - 1 चमचा, मोहरी - 1 लहान चमचा, जिरा- 1 चमचा, गरम मसाला - 1चमचा. 
 
विधी - सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून आधी कांदा परतून घ्या. त्यात वाटलेले आलं, लसूण, टोमॅटो आणि मसाले घालून 5 मिनिट परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक कापलेली फूलकोबी आणि मटर मिसळून मध्यम आचवर नरम होईपर्यंत शिजवून घ्या. आता या मिश्रणाला मॅश करून घ्या. नंतर यात लिंबाचा रस मिसळून घ्या. वरून कोथिंबीर घालून 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्या आणि गॅस बंद करून द्या. याला गरम बटर स्लाइस घालून सर्व्ह करा. तुम्ही याला पोळी किंवा परोठेसोबत सर्व्ह करू शकता.