साहित्य : ५00 ग्रॅम कोवळी लहान वांगी, अर्धी वाटी खोबर्याचा कीस, २ टे स्पू. तीळ, २ टे. स्पू. शेंगदाण्याचा कूट, २ टे. स्पू. धने-जिरेपूड, २ टे. स्पू. काळा मसाला, लाल तिखट, मीठ, हळद, १ टे. स्पू. किसलेला गूळ, फोडणीसाठी (जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग, मेथीदाणे) अर्धी वाटी खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर.