1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

व्हेजिटेबल ग्रेव्ही!

ND
साहित्य : 100 ग्रॅम कलिंगड बी (मगज), 50 ग्रॅम तीळ, 25 ग्रॅम खसखस, 20-25 काजू तुकडे, 6 टोमॅटो, 6 कांदे, तमालपत्री, मिरे, दालचीनी, मसाला वेलदोडे, साधे वेलदोडे प्रत्येकी 2-2, थोडेसे दूध, थोडेसे दही, थोडासा चिमूटभर लाल खाण्याचा रंग.

कृती : प्रथम कलिंगड बी (मगज), काजू, तीळ, खसखस 4-5 तास भिजत ठेवणे. नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
कांदा व टोमॅटो हे दोन्ही वेगवेगळे मिक्सरमधून बारीक करून करावे.

नंतर पातेल्यात अर्धी वाटी तेल टाकून त्यात तमालपत्री, मिरे, दालचीनी, मसाला वेलदोडे, साधे वेलदोडे टाकावे. नंतर वाटलेली टोमॅटोची पेस्ट टाकावी, ती चांगली तेल सुटेपर्यंत परतावी. नंतर कांद्याची पेस्ट घालून ती ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी. नंतर तीळ, खसखस, कलिंगड बी, काजू वाटलेली पेस्ट टाकावी व चांगले तेल सुटेपर्यंत परतावी. नंतर त्यात दूध व दही व चिमूटभर रंग घालून एकदा परतून घ्यावे. ही तयार झालेली ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवावी. ही ग्रेव्ही छोले, मटर, कोबी व बटाटे या भाज्यांमध्ये वापरता येते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा