शेंगदाण्याचे कारले
|
कृती : कारले सोलून त्यांना मधून चिरा देऊन त्यातील बिया काढून घ्यावा व त्यात मीठ भरून ठेवावे. नंतर उकळत्या पाण्यात ते कारले 5-10 मिनिट वाफवून घ्यावे. कारले चांगल्या प्रकारे उकळल्यावर चाळणीत घालून त्याचे पाणी काढून घ्यावे. एका प्लेटमध्ये वर दिलेले साहित्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. आता ते मिश्रण कारल्यात भरून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे व शोप घालून फोडणी द्यावी व भरलेली कारली कढईत टाकून 5-7 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
